महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Palghar Crime: शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार; शिरपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Giving Gungi Drug

बोईसर परिसरात एक धक्कदायक घटना घडली आहे. शितपेयात गुंगीचे औषध देऊन तरुणाने २१ वर्षीय तरुणीला मारहाण करत अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. शिरपूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Unnatural abuse of young woman
तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार

By

Published : Apr 8, 2023, 3:10 PM IST

पालघर ( बोईसर ) : शितपेयात गुंगीचे औषध देऊन बोईसर येथील नराधम तरुणाने २१ वर्षीय तरुणीला मारहाण करत, अमानुष आणि अनैसर्गिकरित्या बलात्कार करुन तिचे विवस्त्र फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. सलग तीन वर्षे त्याचा अमानुष अत्याचार असाह्य झाल्याने अखेर त्याला धडा शिकवण्यासाठी तरुणीने फिर्याद दिल्याने शिरपूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.


शीतपेयात दिले गुंगीचे औषध : बोईसर येथील भूषण वसंत करणकाळे याने २०१९ मध्ये चोपडा तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणीशी मैत्री केली. तिला शिरपूर येथील हॉटेलवर घेऊन गेले तिच्या शीतपेयात गुंगीचे औषध टाकले व तिच्या अंगाला स्पर्श करू लागला. तरुणीने त्याला विरोध केला असता तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिचे विवस्त्र आणि बिभित्स अवस्थेत फोटो काढले. त्याच फोटोवरून तिला वेळीवेळी ब्लॅकमेल करत तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिकरित्या तिच्यावर अत्याचार करीत होता.


भावाला मारण्याची दिली धमकी: कधी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील हॉटेलमध्ये तर कधी मुंबई येथे बोलावत तिच्यावर अत्याचार करत होता. तरुणीने त्याला विरोध केला तर तिला मारहाण करीत तिच्या आई आणि भावाला मारण्याची धमकी देत होता. पीडित तरुणी २०१९ पासून हा त्रास सहन करत होती. अखेर तिला हा त्रास असह्य झाला. तरुणीला वडील नसल्याने तिने आईला सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. नंतर स्वतःला सावरत या नराधमाला धडा शिकवण्यासाठी तरुणीच्या आईने सरळ शिरपूर पोलीस ठाणे गाठत २७ मार्च रोजी भूषण वसंत करणकाळे वय ( वर्ष २७) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

बोईसर येथून आवळल्या मुसक्या :भारतीय दंड संहिता ३७६, ३७६ (२), ३७७, ३२३, ५०४, ५०६ कलमानुसार शिरपूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर पोलिसांनी आरोपी भूषण वसंत करणकाळे याला रविवारी बोईसर येथील यशवंत सृष्टी येथून ताब्यात घेतले आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले. त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.



विकृत अन् लिंगपिसाटचा कळस: आरोपी भूषण वसंत करणकाळे हा विकृत स्वभावाचा आणि लिंगपिसाट आहे. त्याच्यावर या अगोदर देखील बोईसर पोलीस ठाण्यात विनयभंग सारखा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळेस हा बोईसर येथून सहा महिने फरार झाला होता. सदर विनयभंग केल्याप्रकरणी समोरच्या महिलेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत विनयभंगाची तक्रार मागे घ्यायला लावत होता. तर त्याच्या बाजूलाच राहत असलेल्या महिलेवर दबाव टाकत तक्रार मागे घ्यायला भाग पाडले. त्यामुळे कायद्याने त्याला ठेचून काढण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी पिडिताकडून मागणी होत आहे.

हेही वाचा:Mentally Challenged Girl Raped मुंबईत मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपी अटकेत जेवणाच्या बहाण्याने घरी बोलवून करायचा अत्याचार

ABOUT THE AUTHOR

...view details