नालासोपारा (पालघर) - येथील चंदन नाका येथे एका पिकअप वाहनात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
टेम्पोत अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ; नालासोपाऱ्यातील घटना - women dead body nalasopara
चंदन नाका येथे एका पिकअप टेम्पोत गोणीमधून वास येत होता. यावेळी वाहनचालकाने टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना फोन करून बोलावले. यानंतर पाहणी केली असता त्या गोणीत मृतदेह आढळून आला.
चंदन नाका येथे एका पिकअप टेम्पोत गोणीमधून वास येत होता. यावेळी वाहनचालकाने टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना फोन करून बोलावले. यानंतर पाहणी केली असता त्या गोणीत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. यानंतर पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. दरम्यान, त्या महिलेची ओळख अजूनही पटलेली नाही. तर हा खून नेमका कोणी आणि का केला? याचा तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा -आजपासून राज्यातील सलून खुली, अतिरिक्त खर्चामुळे चालक हैराण