पालघर - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार फाट्याजवळील दाट झाडीत आज सकाळी १८ ते २० वर्षीय अज्ञात तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विरार फाट्याजवळ अज्ञात तरुणीचा आढळला मृतदेह - mumbai ahmadabad highway
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा, खानिवडे, तानसा नदी तसेच मुंबई परिसरात हत्या केलेले मृतदेह सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी महामार्गावरील गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.

विरार फाट्याजवळ अज्ञात तरुणीचा आढळला मृतदेह
विरार फाट्याजवळ अज्ञात तरुणीचा आढळला मृतदेह
स्थानिकांनी घटनेची माहिती मांडवी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह विरारच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच ही हत्या की अपघात आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा, खानिवडे, तानसा नदी तसेच मुंबई परिसरात हत्या केलेले मृतदेह सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी महामार्गावरील गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.
TAGGED:
mumbai ahmadabad highway