पालघर - बोईसर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार संतोष जनाठे हे बहुजन विकास आघाडीने सोडलेले मांजर असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हे मांजर जशी शिट्टी वाजेल तसे, शिट्टीच्या तालावर इकडून-तिकडे उड्या मारत शेपूट हलवतात, असे ते म्हणाले.
संतोष जनाठे म्हणजे बहुजन विकास आघाडीने सोडलेले मांजर; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
बोईसर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार संतोष जनाठे हे बहुजन विकास आघाडीने सोडलेले मांजर असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हे मांजर जशी शिट्टी वाजेल तसे, शिट्टीच्या तालावर इकडून-तिकडे उड्या मारत शेपूट हलवतात, असे ते म्हणाले.
शिवसेना-भाजप महायुती विकासाचे धोरण घेऊन पुढे चालले असून, या विकासाच्या आड येणारी ही बंडखोर मांजरे आणि त्यांना नाचवणारे मालक हे निकालाच्या दिवशी पालपाचोळ्यासारखे उडून जातील, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पालघर व बोईसर विधानसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीनिवास वनगा व विलास तरे यांच्या निवडणूक प्रचारासाठी मनोर येथील हातनदी मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मतदारसंघातील स्थानिक विरोधकांवर निशाणा साधला.