पालघर (वसई)- लॉकडाऊनमध्ये समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन करणे दोन तरुणांच्या जीवावर बेतले आहे. वसईच्या सुरूची समुद्रात दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अजित विश्वकर्मा (वय,१३) व रणजित विश्वकर्मा (वय, २०) अशी दोघांची नावे असून, दोघे चुलत भाऊ असल्याची माहिती समोर येत आहे.
वसईच्या सुरुची समुद्रात दोन तरुणांचा बुडून मृत्यू - Vasai Palghar beach
आज रविवार निमित्ताने समुद्रकिनारी मोठ्या संख्येने नागिरक येत असतात. आज नालासोपारा येथे राहणारे एक कुटुंब वसईच्या सुरुची समुद्र किनाऱ्यावर आले होते. या कुटुंबाती दोन तरुण पाण्याच अंदाज न आल्याने पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे.
![वसईच्या सुरुची समुद्रात दोन तरुणांचा बुडून मृत्यू सुरुची समुद्र किनारा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12355151-116-12355151-1625410559777.jpg)
पाण्याच्या लाटांसोबत समुद्रात खेचले गेले
रविवार निमित्ताने समुद्रकिनारी मोठ्या संख्येने नागिरक येत असतात. नालासोपारा येथे राहणारे एक कुटुंब वसईच्या सुरुची समुद्र किनाऱ्यावर आले होते. त्यातील काही तरुण दुपारनंतर पोहण्याचा आनंद घेण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले होते. यावेळी समुद्र खवळलेला असल्याने, दोघेजण पाण्याच्या लाटांसोबत समुद्रात खेचले गेले व पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर दोघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास दोन्ही मृतदेह समुद्रकिनाऱ्याला सापडले. वसई पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत, पुढील तपासासाठी पाठवले आहेत. वसई पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.