महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाईक राईडचा आनंद बेतला जीवावर, जोगेश्‍वरीतील दोघे तरुण विरार येथील तलावात बुडाले! - virar youth drowned news

बाईक राईडचा आनंद घेण्यासाठी जोगेश्‍वरी येथील तरुण भाटपाडा येथे आले होते. त्यानंतर त्यांनी येथील तलावाकडे आपला मोर्चा वळविला. परंतु तेथे काठावर उभे असताना दोघेही पाय घसरुन तलावात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी बचावकार्य राबविले असता दोघांचाही मृतदेह आढळून आला.

two youth from jogeshwari drowned in bhatpada lake at virar in palghar
जोगेश्‍वरीतील दोघे तरुण विरार येथील तलावात बुडाले!

By

Published : Sep 13, 2020, 8:20 PM IST

Updated : Sep 13, 2020, 8:33 PM IST

विरार (पालघर) - मुंबईतील जोगेश्‍वरी येथून विरार पूर्व येथील भाटपाडा येथे बाईक राईडसाठी आलेल्या दोघा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली. बुडालेल्या दोघाही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बाईक राईडचा आनंद बेतला जीवावर, जोगेश्‍वरीतील दोघे तरुण विरार येथील तलावात बुडाले!
मुंबई-जोगेश्‍वरी हिंद नगर कॉलनी येथील १० जणांचा ग्रुप दोन बाइक आणि एका कारने विरार पूर्वेतील भाटपाडा येथील तलावावर आला होता. या ग्रुपमधील महेंद्र मंगेश राणे ( 25) आणि सूर्यकांत सुवर्णा (34) हे दोघे तलावाच्या काठावर उभे असताना पाय घसरून पाण्यात पडले. दोघेही बुडू लागल्याने इतर तरुणांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. मंगेश राणे हा महिंद्रा अँड महिंद्र; तर सूर्यकांत सुवर्णा हा एका खासगी कंपनीचा कर्मचारी आहे.कोरोना आपत्तीमुळे वसई-विरारमधील पर्यटनबंदी पालघर जिल्हा प्रशासनाकडून घोषित करण्यात आली आहे. त्यानंतरही मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक वसई-विरारमध्ये पर्यटनासाठी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पर्यटनबंदी असतानाही अनेक तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यंदाच्या कोरोना आपत्तीतही घडल्या आहेत. पोलीस व महापालिका प्रशासनाची नजर चुकवून वसईतील पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा सुट्टीच्या दिवशी राजरोस वावर दिसून येत असल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग प्रतिबंध अधिनियम कायदा धाब्यावर बसवला गेला आहे.
Last Updated : Sep 13, 2020, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details