पालघर -तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज या कारखान्यात झालेल्या मंगळवारी रात्री स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात दोन कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज प्लॉट नं. एन 198 या औषधाचा कच्चा माल बनविणाऱ्या कारखान्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास रिॲक्टरमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू होती. यावेळी एका रिॲक्टरमधून दुसऱ्या रिॲक्टरमध्ये रासायनिक पदार्थ पाठवले जात असताना हवेच्या उलट्यादाबामुळे रिॲक्टरजवळ असणाऱ्या युग्लासचा स्फोट झाला. स्फोटानंतर आगीत लागलेल्या आगीवर कंपनीतील कामगारांनीच नियंत्रण मिळवले.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात स्फोट; दोन कामगार जखमी
औषधाचा कच्चा माल बनविणाऱ्या कारखान्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास रिॲक्टरमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू होती. यावेळी एका रिॲक्टरमधून दुसऱ्या रिॲक्टरमध्ये रासायनिक पदार्थ पाठवले जात असताना हवेच्या उलट्या दाबामुळे रिॲक्टरजवळ असणाऱ्या युग्लासचा स्फोट होऊन आग लागली. या आगीवर कंपनीतील कामगारांनीच नियंत्रण मिळवले.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात स्फोट
हेही वाचा -LIVE मुंबईत मुसळधार..! अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद, न्यायालयासही सुट्टी
या स्फोटात दोन कामगार जखमी झाले आहेत. प्रदीप पाटील व शांताराम जाधव अशी जखमींची नावे असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.