महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन महिला कामगारांचा संशयास्पद मृत्यू; तारापूर औद्योगिक वसाहतीतील घटना

कंपनीत दुपारच्या जेवणाच्या वेळी या दोन्ही महिला जेवणाच्या ठिकाणी आल्या नाहीत. त्यामुळे महिला कामगारांचे त्याच कंपनीत शोध घेतल्या गेले. यावेळी दोन्ही महिला त्या काम करीत असलेल्या ठिकाणी बेशुद्धावस्थेत आढळून आल्या.

मृत महिला कामगारांचे दृष्य

By

Published : Aug 6, 2019, 6:51 AM IST

पालघर (वाडा)- तारापूर औद्योगिक वसाहतीतील वेलियंट ग्लास वर्क कंपनीत काम करणाऱ्या दोन महिला कामगारांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. झुमली काळू मावी (वय ४५) व वरसूद बाळू मावी (१८) असे या दोन मृत महिलांची नावे आहेत.

मृत महिला कामगारांचे दृष्य

कंपनीत दुपारच्या जेवणाच्या वेळी या दोन्ही महिला जेवणाच्या ठिकाणी आल्या नाहीत. त्यामुळे महिला कामगारांचे त्याच कंपनीत शोध घेतल्या गेले. यावेळी दोन्ही महिला त्या काम करीत असलेल्या ठिकाणी बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. त्यानंतर या महिला कामगारांना उपचारार्थ बोईसर येथील सिटी जनरल रुग्नालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दोन्ही महिला मूळच्या ऊत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. बोईसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी एडीआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या दोन महिलांच्या मृत्यूचे कारण शोधले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details