पालघर- बोईसरमधील विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या चोरट्याकडून 3 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. रामनंदन ऊर्फ बिल्ला गणेश पासवान (वय 19 वर्षे, रा.धोडीपूजा) असे सदर चोरट्याचे नाव आहे.
हेही वाचा - कांदा रडवणार! कांद्याने पार केली 'शंभरी'
स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल जाधव यांना एका दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान बिल्ला पासवान या दुचाकी चोराबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.