पालघर : कासा-जव्हार मार्गावर वेती येथे मोटरसायकल व अज्ञात वाहन यांच्यात अपघात झाला आहे. या अपघातात अज्ञात वाहनाखाली चिरडल्याने दोन जण जागीच दगावले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
कासा-जव्हार मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना चिरडले; दोघांचा मृत्यू , एक गंभीर - दुचाकी अपघात
पालघरच्या कासा-जव्हार मार्गावर एका अज्ञात वाहनाने मोटारसायकल स्वारांना चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
![कासा-जव्हार मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना चिरडले; दोघांचा मृत्यू , एक गंभीर two wheeler accident in palghar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6377989-thumbnail-3x2-aa.jpg)
दुचाकी अपघात
हेही वाचा.......तर बाबरी मशिदीचा संघर्ष टळला असता - शरद पवार
कासा-जव्हार मार्गावर वेती नजीक अज्ञात वाहनाने मोटरसायकलस्वारांना धडक दिल्याने हा अपघात घडला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. अंकुश जगन डोकफोडे (32 रा. वेती) आणि राहुल शंकर गायकवाड (28 रा. कासा) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.