पालघर - खारेकुरण मिठागार येथे एका दुचाकीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीवरून फिरायला गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. नितेश पंढरीनाथ कराटे, असे मृत तरुणाचे नाव आहे. तर सुशांत अजय पत्ती, हा गंभीर जखमी झाला आहे.
पालघरमध्ये दुचाकीला अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी - नितेश पंढरीनाथ कराटे
नितेश कराटे आणि सुशांत पत्ती हे दोघे मोटारसायकल घेऊन खारेकुरण मिठागर येथे फिरायला गेले होते. तेथून पालघरला परतत असताना तोल जाऊन त्यांची दुचाकी एका झाडावर आदळली. या अपघातात नितेशच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, सुशांत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात, पती-पत्नीसह अन्य एक जण गंभीर जखमी
नितेश आणि सुशांत हे दोघे मोटारसायकल घेऊन खारेकुरण मिठागर येथे फिरायला गेले होते. तेथून पालघरला परतत असताना तोल जाऊन त्यांची दुचाकी एका झाडावर आदळली. या अपघातात नितेशच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, सुशांत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत नितेश पंढरीनाथ कराटे याचे वडील पालघर पोलीस दलात कार्यरत आहेत.