महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरदिवसा विरारमध्ये गोळीबार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल - विरार गुन्हे बातमी

विरार पूर्वेकडील बरफपाडा येथे राहणाऱ्या एका 42 वर्षीय व्यक्तीवर पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

आसाराम राठोड
आसाराम राठोड

By

Published : Sep 22, 2020, 9:22 PM IST

विरार (पालघर)- विरार पूर्वेकडील बरफपाडा येथे राहणाऱ्या 42 वर्षीय कंत्राटदारावर मंगळवारी (दि. 22 सप्टें.) दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांपैकी एकाने एक गोळी झाडली. पण, ती गोळी छातीच्या बाजूने निघून गेल्याने ते सुदैवाने बचावले आहे. मात्र, ते किरकोळ जखमी झाले आहेत. विरार पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जुन्या वादातून गोळीबार झाला असल्याचा पोलिसांना संशय आहे. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून हा गोळीबार कोणी व का केली याचा शोध घेत तपास करत आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी व जखमी
विरार पूर्वेकडील बरफपाडा येथे राहणारे आणि पेशाने कंत्राटदार असणारे आसाराम सदाशिव राठोड (वय 42 वर्षे) यांच्यावर आज (मंगळवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बरफेश्वर तलाव फाटक क्रमांक-1 येथे उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींपैकी मागे बसणाऱ्याने त्यांच्यावर एक गोळी झाडली. पण छातीच्या बाजूने गोळी निघून गेल्याने ते सुदैवाने बचावले आहे. आसाराम यांच्या व्हाट्सअ‌ॅपवर काही दिवसांपूर्वी कोणी तरी बंदूक आणि गोळीचा फोटो पाठवल्याचेही कळते आहे. पोलीस त्यादृष्टीकोनातूनही तपास करत शोध घेत आहे. मुलाने प्रेमविवाह केला असून त्या मुलीच्या घरच्यांकडून गोळीबार झाल्याचे आमाराम राठोड यांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details