पालघर -जव्हार तालुक्यातील बोरहट्टी गावात मातीचा ढिगारा अंगावर पडून दोघांचा मृत्यू झाला. आदिवासी शेतकरी घरांसाठी माती काढत असताना ही घटना घडली. या घटनेत आणखी दोन जण गंभीर तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.
बोरहट्टी येथे मातीचा ढिगारा अंगावर पडून दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी - आदिवासी शेतकरी
घराला लेप लावण्यासाठी बोरहट्टी गावातील काही आदिवासी बांधव शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेतातील माती घेण्यासाठी गेले होते. कुटुंबातील आणि नातेवाईक असे एकूण आठ जण मातीसाठी खोदकाम करत होते. अचानक मातीचा ढिगारा खाली सरकला आणि तेथे काम करत असलेल्या आदिवासींच्या अंगावर येऊन पडला.

या ढिगाऱ्याखाली दबून मनोज यशवंत जाधव (वय-३०) व मुक्ता सुदाम तराळ (वय-१६) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. दुखापत झालेल्यांवर जव्हार येथील कुटीर रुग्णालयात उपचार करण्यात आले. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी बाहेर गावी हलवण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास मराड यांनी सांगितले आहे.