महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 10, 2021, 6:43 PM IST

Updated : Jun 10, 2021, 7:54 PM IST

ETV Bharat / state

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल

पालघर जिल्ह्यात 15 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत.

एनडीआरएफचे पथक
एनडीआरएफचे पथक

पालघर - जिल्ह्यात येत्या पंधरा तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पालघर तालुक्यात एक व वसई येथे एक अशा एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाले आहेत.

माहिती देताना अधिकारी

पालघर जिल्ह्यात बुधवारपासून (दि. 9 जून) मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र सध्या पावसाने थोडी उसंती घेतली आहे. तरी हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. येत्या 15 जूनपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी केल्यानुसार पालघर जिल्ह्यासाठी 5 अधिकारी व 33 जवानांची एनडीआरएफच्या दोन तुकड्या पालघर तालुक्यातील मनोर व वसई येथे दाखल झाली आहे. मनोर येथे तीन अधिकारी व 17 जवान तसेच वसई येथे दोन अधिकारी व 16 जवान तैनात आहेत. जिल्ह्यात कुठेही आपत्ती उद्भवल्यास या तुकड्यांकडे आद्ययावत यंत्रणा आहेत. याचबरोबर पुरजन्य परिस्थितीसाठी बोट, लाईफ जॅकेट, झाडे कापण्याची यंत्र या तुकड्यांकडे आहे. याचबरोबर काही पाणबुडीही या तुकड्यात असल्याचे डेप्युटी कामंडन्ट अनिल तलकोतरा यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -जाळ्यात अडकलेल्या हॉक्सबिल प्रजातीच्या कासवाला मच्छिमारांकडून जीवदान

Last Updated : Jun 10, 2021, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details