पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात मनोर नजीक वाडा खडकोना येथे झाला असून यामध्ये 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि ट्रकचा अपघात, 3 जण किरकोळ जखमी - जखमी
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि ट्रकचा अपघात, दोघे जखमी
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर नजीक वाडा खडकोना येथे एक स्विफ्ट कार मुंबईच्या दिशेने जात होती. त्यावेळी कारचे मागचे टायर फुटल्याने कार रस्त्यावरील दुभाजकावर आदळून आय.आर.बीच्या ट्रकला धडकली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी 3 जण किरकोळ जखमी झाले असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Last Updated : Jun 22, 2019, 9:00 PM IST