पालघर - विद्युत पुरवठा करणाऱ्या तुटलेल्या तारेचा धक्का लागून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना तलासरी येथे घडली. वीज वितरण विभागाचा भोंगळ कारभार दोन तरुणांच्या जीवावर बेतला आहे. मिथुन बेंडगा आणि संदीप राजड अशी त्यांची नावे आहेत. जखमींवर तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तलासरी येथे वीज पुरवठा करणारी 240 व्हॅट विद्युत पुरवठा क्षमतेची विद्युत वाहिनी दोन दिवसांपासून तुटून पडली आहे. ग्रामस्थांनी तक्रार दिल्यानंतर वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ही तुटलेली तार खेचण्याचे काम सुरू केले.