महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिलेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणाऱ्या दोघांना उत्तरप्रदेशातून अटक - accused arrested from up

महिलेचे व्हॉट्सअ‌ॅप प्रोफाइल फोटो आक्षेपार्हरित्या एडिट करून समाजमाध्यमांवर व्हायरला करणाऱ्या दोघांना पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. ही कारवाई बोईसर पोलिसांनी केली.

midc boisar police station
एमआयडीसी बोईसर पोलीस ठाणे

By

Published : Oct 10, 2020, 7:00 PM IST

पालघर -बोईसर येथे राहणाऱ्या एका महिलेचे व्हॉट्सअ‌ॅपच्या प्रोफाईलवरील फोटो घेऊन ते आक्षेपार्हरित्या एडिट करून समाजमाध्यमांवर व्हायरल करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बोईसर पोलिसांनी या आरोपींना उत्तरप्रदेश येथून अटक केली.

एमआयडीसी बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे याबाबत माहिती देताना.

अटक केलेले दोन्ही आरोपी काही दिवसांपूर्वी बोईसर येथे आपल्या नातेवाईकांकडे आले होते. त्यांनी त्याच घरातील महिलेचा मोबाईल नंबर घेऊन सदर महिलेचे व्हॉट्सअ‌ॅप प्रोफाइल फोटो आक्षेपार्हरित्या एडिट केले. तसेच समाज माध्यमांवर व्हायरल केले. त्यानंतर सदर महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी बोईसर पोलीस ठाणे गाठत दोघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणाऱ्या या दोघांना बोईसर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक केली.

अटक केलेल्या आरोपींविरोधात बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना आज (शुक्रवारी) पालघर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details