महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये 220 कोरोना रुग्ण वाढले; 202 जणांची कोरोनावर मात - Vasai corona cases live

वसई-विरारमध्ये शुक्रवारी 220 कोरोना रुग्ण वाढले आहेत. 202 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला.

Vasai Virar Corona Update
वसई-विरार कोरोना अपडेट

By

Published : Jul 4, 2020, 12:42 PM IST

वसई-विरार (पालघर)- वसई विरारमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. दिवसाला सरासरी 150 ते 200 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत.तसेच शुक्रवारी वसई - विरारमध्ये एका दिवसात 220 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

शुक्रवारी दिवसभरात उपचारादरम्यान कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 202 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

220 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 838 वर जाऊन पोहोचली आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 125 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.

पालिका क्षेत्रात आतापर्यंत 2 हजार 391 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details