वसई-विरार (पालघर)-राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी वसई-विरारमध्ये तब्बल 283 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
वसई-विरारमध्ये गुरुवारी 283 नवे रुग्ण; एकूण संख्या 10 हजार 606 वर - वसई विरार कोरोना अपडेट
वसई-विरारमध्ये गुरूवारी 283 नवे रुग्ण आढळले आहेत. पालिका क्षेत्रातील एकुण संख्या 10 हजार 606 वर पोहोचली आहे. 6972 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गुरुवारी दिवसभरात उपचारादरम्यान 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 129 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकाच दिवसात 283 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 10 हजार 606 वर पोहोचली आहे.
वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 219 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे. तर आतापर्यंत 6 हजार 972 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 3 हजार 415 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.