पालघर- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील गॅलेक्सी सरफॅक्टंट कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी दिली.
तारापूर औद्योगिक वसातीतील कंपनीत स्फोट, दोघांचा मृत्यू - tarapur MIDC blast news
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील गॅलेक्सी सरफॅक्टंट कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट एम-३ स्थित गॅलेक्सी सरफॅक्टटंट या कंपनीत सॅनिटायझर व हॅण्डवॉश निर्मितीचे काम सुरु आहे. आज सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास काम संपवून कामगार आपाल्या घरी परतले. पण, काही कारणाने फायर आलार्म वाजला याचा शोध घेत असताना साडेअकराच्या सुमारास स्फोट झाला. यात विजय सावंत (वय 44 वर्षे), समीर खोजा (वय 48 वर्षे) या दोन कामगारांचा मृत्यू झाला असून, रुणाल ठाकूर (वय ३८ वर्षे) हा एक कामगार कामगार जखमी झाला आहे. जखमी कामगारावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. स्फोट इतका भीषण होता की स्फोटाचा आवाज सुमारे पाच किमीवर असलेल्या नांदगाव व मुरबे गावांपर्यंत गेला होता.
हेही वाचा -पालघरकरांनो सावधान...विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर राहणार 'ड्रोन'ची नजर