महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये पाण्याच्या डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू - डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

पालघरमधील मोखाडा येथे पाण्याच्या डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

अरशान अखलाक शेख

By

Published : Aug 10, 2019, 2:08 PM IST

Updated : Aug 10, 2019, 3:31 PM IST

पालघर -अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत. अशाच एका पाण्याच्या डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना मोखाडा तालुक्यात घडली आहे. फरहान शाकिर खाटीक (वय७) आणि अरशान अखलाक शेख (वय ७) असे मृत मुलांची नावे आहेत.

मोखाडा मुख्यरस्त्यावरील मशीद परिसरात राहणारे अखलाक शेख यांच्याकडे त्यांचे नातेवाईक पाहुणे म्हणून आले होते. अखलाक यांचा मुलगा अरशान आणि त्यांच्या नातेवाईकाचा मुलगा फरहान दोघेही गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. दोघेही खेळायला जात असतील असा घरच्यांचा समज झाला. त्यामुळे घरच्यांनी त्यांना अडवले नाही. मात्र, रात्री खूप उशीर झाला तरीही मुले घरी आले नव्हते. त्यामुळे सर्वत्र शोधाशोध सुरू झाली.

मोखाडा गाव पालथे घातले तरीही दोघांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंताग्रस्त होते. दरम्यान घरापासून काही अंतरावर असलेल्या भागात असलेल्या डबक्यात एक मुलगा आढळून आला. त्यानंतर दुसऱ्या मुलाचा शोध घेतला असता तो देखील सापडला. दोघांनाही मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. दोन्ही चिमुकल्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Last Updated : Aug 10, 2019, 3:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details