पालघर -नालासोपारा पूर्वेकडील परिसरात सोनसाखळी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना तुळींज पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींकडून आतापर्यंत सहा गुन्ह्यांची उकल झाली असून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त -

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्याच्या परिसरात मागील चार महिन्यांपासून सकाळी मॉर्निंग वॉकला, कामावर जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डवरील आरोपी मनवर मेहबूब शेख (वय 19) आणि अमजद बफाशीर खान (वय 21) यांना 15 डिसेंबरला अटक केले होते. या आरोपींकडून सहा गुन्ह्यांची उकल करत 2 लाख 24 हजारांचे सोन्याचे दागिने, मोबाईल, 1 लाख 10 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपींना पोलीस कोठडी -
सोनसाखळी चोरी करणारे दोन सराईत चोर पकडले आहेत. सहा गुन्ह्यांची उकल करत चोरीचा लाखोंचा माल जप्त केला आहे. यांच्या आणखी साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे यांनी दिली.