महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जादुटोणा करून 20 वर्षीय महिलेवर अत्याचार, 2 जणांना अटक - women physical abuse Pelhar

जादुटोणा करून काळी जादू उतरवतो, अशी भंपकबाजी करून 20 वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना पेल्हार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना नालासोपारा पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राशिद कम्पाउंड, गावराई पाडा परिसरात घडली. मौलाना रज्जब शेख (वय 50) व शहाबुद्दीन (वय 27) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

witchcraft case Pelhar Police Thane
पेल्हार पोलीस ठाणे

By

Published : Mar 3, 2022, 5:03 PM IST

Updated : Mar 3, 2022, 7:17 PM IST

पालघर -जादुटोणा करून काळी जादू उतरवतो, अशी भंपकबाजी करून 20 वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना पेल्हार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना नालासोपारा पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राशिद कम्पाउंड, गावराई पाडा परिसरात घडली. मौलाना रज्जब शेख (वय 50) व शहाबुद्दीन (वय 27) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा -Special Story : किसान रेल्वेमुळे डहाणू - घोलवड चिकू व्यापार गतिमान; गतवर्षी 35 हजार टन चिकूची वाहतूक

मौलाना रज्जब शेख व शहाबुद्दीन हे परिसरातील महिलांना तुमच्यावरील काळी जादू उतरवून देतो व त्रासातून मुक्त करतो, अशी आमिषे दाखवत होते. जादुटोणा करण्याच्या बहाण्याने महिलांवर अत्याचार करत होते, मात्र नालासोपारा-गावराई पाडा येथील एका 20 वर्षीय महिलेने अशाप्रकारे आपली फसवणूक झाल्याची तक्रार पेल्हार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींबाबत माहिती घेतली असता दोघेही आरोपी राहते ठिकाण सोडून पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे, पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवत मौलाना रज्जब शेख व शहाबुद्दीन या दोघांना नालासोपारा येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले. या दोघांच्या अधिक चौकशीत हे दोघे काळी जादू उतरवतो, असे सांगून महिलांवर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ - 3 विरारचे प्रशांत वाघुडे, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौघुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत अवघडे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख आदींनी केली.

हेही वाचा -Viral Video : विरारमध्ये प्रसिद्ध गुजराती गायिकेच्या गाण्यावर ताल धरत तिच्या अंगावर उधळले नोटांचे बंडल..

Last Updated : Mar 3, 2022, 7:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details