विरार(पालघर)- पत्नीची छेड काढणाऱ्यांचा विरोध करणाऱ्या पतीच्या डोक्यात काचेची बाटली फोडत मारहाण केली होती. उपचारा दरम्यान त्याचा पहाटे 2 वाजता मृत्यू झाला आहे. ही घटना अर्नाळा येथे सोमवारी (दि. 5 एप्रिल) पहाटे साडेतीनच्या सुमरास घडली.
पत्नीची छेड काढणाऱ्यांचा विरोध करणाऱ्या पतीची हत्या, दोघे अटकेत - पालघर जिल्हा बातमी
पत्नीची छेड काढणाऱ्यांचा विरोध करणाऱ्या पतीची मारहाण करत हत्या करण्यात आली. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
सोमवारी पहाटे ब्लेस पतेली व मोसे वाॅल्टर कोतवाल या दोन आरोपींनी दारूच्या नशेत मृत व्यक्तीच्या पत्नीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भरत दिवे याने मदतीसाठी धाव घेतली असता त्याला मारहाण करून ते पळून गेले. त्यानंतर भरत दिवे हा मारहाणीनंतर घरीच झोपून होता. सोमवारी (दि. 5 एप्रिल) रात्री त्याला परिसरातील नागरिकांनी रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा -पालघर पोलीस दलामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन