महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tunisha Sharma Suicide Case: तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण: आरोपी शिझानला उद्यापर्यंत पोलीस कोठडी

Tunisha Sharma Suicide Case: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्या प्रकरणात वसई न्यायालयाने आरोपी शिझानला उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

TV actor Tunisha Sharma Suicide case Vasai Court sent accused Shizan to police custody till tomorrow
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण: आरोपी शिझानला उद्यापर्यंत पोलीस कोठडी

By

Published : Dec 30, 2022, 1:51 PM IST

Updated : Dec 30, 2022, 3:43 PM IST

वसई :अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूचे ( Tunisha Sharma Suicide Case ) कारण शोधण्यापेक्षा आत्महत्या प्रकरण आरोप-प्रत्यारोप तसेच धर्माच्या मतभेदांमध्ये अडकताना दिसत आहे. तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी शुक्रवारी सकाळी खळबळजनक दावा केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना वनिता म्हणाल्या की, आपल्या मुलीचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेला. फक्त शीझान खानच नाही तर, त्याचे संपूर्ण कुटुंब तुनिशावर धर्मांतरासाठी दबाव टाकायचे. शीजानची आई तुनिषाचा छळ करत असे. शीजानची बहीण तुनिशाला दर्ग्यात घेऊन जायची. शीजानने तुनिशाशी ( Tunisha Sharma Suicide ) लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते.

शीजानकडून तुनिषाला मारहाण - एवढेच नाही तर शीजानने ( Sheezhan Khan ) तुनिशाला मारहान देखील केली होती असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. मीडियाशी बोलताना तुनिषाची आई वनिता शर्मा की, शीजनचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याची तुनिषाला आधीच माहिती होती. 'तुनिषाने शीजानच्या फोनमध्ये दुसऱ्या मुलीसोबत झालेल्या चॅट वाचले होते. त्यामुळेच दोघांचे ब्रेकअप झाले. त्यावर शीजानने तुनिशाला सांगितले की, तुला जे करायचे आहे ते कर. या प्रकरणात शीजनची आई, बहीण यांचाही सहभाग आहे असे शर्मा म्हणाल्या.

आरोपी शिझानला उद्यापर्यंत पोलीस कोठडी

'शीजानला शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही'-तुनिषाची आई पुढे म्हणाली, 'शीझान खानला शिक्षा होईपर्यंत मी शांत बसणार नाही. शीजनने माझ्या मुलीशी लग्न करण्याचे वचन दिले होते.मात्र, त्याने तनुषा सोबत फसवणूक केली. माझी मुलगी गेली, आता मी एकटी आहे. माझ्या मुलीला कोणताही आजार नव्हता. तीला फक्त OCD (ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर) ची समस्या होती.

'शीजानची आई तुनिषाचा छळ करायची'-तुनिशाच्या आईने दावा केला आहे की, शीजान, त्याचे कुटुंब तुनिषाला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडत होते. 'शीजानसह त्याचे कुटुंबीय तुनिशाला इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगायचे. शीजानची बहीण तुनिशाला दर्ग्यात घेऊन जायची. माझी मुलगी त्याच्या बोलण्यात पूर्णपणे गुंतली होती. त्याच्या सांगण्यावरून तनुषा तशी वागत असे. त्याची आई माझ्या मुलीला त्रास देत असे. तीला कुत्र्यांची भीती वाटत होती पण, शीजानच्या आईच्या सांगण्यावरून तुनिषाने घरात एक कुत्राही पाळला होता. तुम्ही विचार करा, माझ्या मुलीवर त्याचा किती प्रभाव होता. शीजानला भेटल्यानंतर तिने हिजाब घालायला सुरुवात केली. त्याच्याकडून उर्दू शिकायला सुरुवात केली.

तुनिशाला ख्रिसमसला चंदीगडला जायचे होते -शनिवारी तुनिषाच्या मृत्यूचा संदर्भ देत वनिता शर्मा पुढे म्हणाल्या, 'ती आदल्या रात्री सेटवर शीजनशी बोलायला गेली होती. शीजान तीला म्हणाला तुला जे करायचं ते कर. माझी मुलगी आनंदी होती, नाराज नव्हती. ती दोन दिवसांची सुट्टी घेऊन चंदीगडला ख्रिसमस साजरा करण्यासाठी जाणार होती. शनिवारी दिवसभर मी बोलले होते. तिला चंदीगडला जायचे असल्याचे तिने माला सांगितले होते.

'शीझान खान ड्रग्ज घेत असल्याचं तुनिषाने सांगितलं होतं' - तुनिषाच्या आईने दावा केला आहे की, शीझान खान टीव्ही शोच्या सेटवर ड्रग्ज घेत असे. 'हे असं कधीपासून होतं मला माहीत नाही. पण तुनिशानेच मला सांगितले की शीजान टीव्ही शोच्या सेटवर ड्रग्ज सेवन करत असे. तुनिषाच्या वागण्यात बदल होऊ लागला होता. त्या दिवशी तिने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट देखील केली होती, पण त्यानंतर काय झाले, आम्हाला माहित नाही.

शीझान खानची पोलीस कोठडीत चौकशी - टीव्ही शो 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी शोच्या सेटवर मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. याच शोमध्ये शीजान खान तुनिषाचा को-स्टार आहे. दोघेही बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते. 15 दिवसांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाले होते. तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी शीजानला शनिवारी रात्री अटक केली. त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम ३०६ म्हणजेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार शीजान खान सध्या पोलिस कोठडीत आहे.

Last Updated : Dec 30, 2022, 3:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details