वसई - तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील ( Tunisha Sharma Suicide Case ) आरोपी शीझान खानची ( Accused Sheezan Khan in Tunisha Sharma suicide case ) तीन दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर आज वालीव पोलिसांनी दुपारी त्याला वसई सत्र न्यायालयात हजर केले. तुनिषाचे वकील तरुण शर्मा म्हणाले आम्ही न्यायालयाकडे पाच दिवसाची पोलीस कोठडी मागणी केली होती. न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शीझान खानने त्याच्या फोनमधून काही व्हाट्सअप चॅटिंग डिलीट केल्याचा दावा तुनिषाच्या वकीलाने केला. झिशानचे इतर महिलांशीही संबंध असल्याचे पोलिसांनी आज न्यायालयासमोर सांगितले. तसेच त्याला भेटल्यावर तुनिषाने हिजाब घालण्यास सुरुवात केली होती अशीही माहिती पवन शर्मा यांनी दिली.
शीझानच्या आईचा जबाब नोंदवणार - तुनिषा शर्माच्या कथित आत्महत्येची चौकशी करणाऱ्या तपास पथकाच्या हाती तांत्रिक धागेदोरे लागल्याचे ( Tunisha Sharma case ) वृत्त आहे. तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, तिचा माजी प्रियकर शीझान खान तिच्यासोबत नात्यात ( Sheezan Khans WhatsApp chat ) असताना त्याच्या आयुष्यात आणखी एक स्त्री होती. त्याच्या व्हॉट्सअप चॅटवरून पोलिसांनी याबाबतचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. टीव्ही अभिनेत्री तुनसिहा शर्माच्या मृत्यूप्रकरणी आम्ही आरोपी शीझानच्या आईचा जबाबही नोंदविणार असल्याचे वालीव पोलिसांनी ( waliv police on Tunish death case ) सांगितले. दरम्यान अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी आरोपी शीझान खानला वालीव पोलिसांनी मुंबईतील वसई न्यायालयात आज हजर केले. शीझानचे इतर महिलांशीही संबंध असल्याचे पोलिसांनी आज न्यायालयासमोर सांगितले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करावा अशी मागणी, तुनिषा शर्माचे काका पवन शर्मा यांनी केली आहे. त्याचबरोबर शीझानला भेटल्यानंतर तुनिषाच्या अनेक गोष्टी बदलल्या होत्या, तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती, अशीही माहिती पवन शर्मा यांनी दिली. दरम्यान खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी आज वाढवून देण्यात आली.