पालघर - नालासोपारा येथे एका रुग्णवाहिकेतून दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने रंगेहात पकडले. पोलिसांनी रुग्णवाहिकेसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रुग्णवाहिकेतून दारुची वाहतूक केल्याप्रकरणी २ जणांना अटक - nalasopara latest news
रुग्णवाहिकेतून दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. पोलिसांनी रुग्णवाहिकेसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रुग्णवाहिकेतून दारुची वाहतूक
नालासोपारा तुळींज येथून मुंबई दहीसरला एका रुग्ण वाहिकेतून दारू नेली जाणार असल्याची खबर तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांना मिळाली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, संध्या पवार, योगेश नागरे, कोळेकर, फडतरे,विनायक राऊत यांनी सापळा रचून दत्ता राठोड व रवी राठोड यांना ताब्यात घेतले. रुग्णवाहिकेसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास तुळींज पोलीस करीत आहेत.