महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत टेम्पो दमणमध्ये सापडला

पालघर शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांच्या गाडीच्या Truck responsible for accident of Vinayak Mete अपघातास कारणीभूत असणारा आयशर टेम्पो पालघर जिल्ह्यातील Truck in vinayak mete accident found in daman असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या टेम्पोच्या मालकाचा शोध सुरू असून कासा भागात टेम्पो मालक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. टेम्पोचा नंबर डीएन 09 पी 9404 असा असून ड्रायव्हरचे नाव उमेश यादव आणि मालकाचे नाव रामबचन यादव असल्याची माहिती आहे. दरम्यान हा टेम्पो रायगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. टेम्पो गुजरात दिशेला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शोध घेण्यासाठी पालघर पोलिसांचे विशेष पथक रवाना झाले होते. दमण येथे हा टेम्पो सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

truck responsible for accident of Vinayak Mete
विनायक मेटे अपघात कारणीभूत ट्रक

By

Published : Aug 15, 2022, 9:36 AM IST

पालघरशिवसंग्रामचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा आयशर टेम्पो पालघर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या टेम्पोच्या मालकाचा शोध सुरू असून कासा भागात टेम्पो मालक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. टेम्पो गुजरात दिशेला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शोध घेण्यासाठी पालघर पोलिसांचे विशेष पथक रवाना झाले होते. दमण येथे हा टेम्पो सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघातास कारणीभूत टेम्पो

हेही वाचाHar Ghar Tiranga तिरंगा घरावर लावताना पाय घसरून पडल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

टेम्पोचा नंबर डीएन 09 पी 9404 असा असून ड्रायव्हरचे नाव उमेश यादव आणि मालकाचे नाव रामबचन यादव असल्याची माहिती आहे. दरम्यान हा टेम्पो रायगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

विनायक मेटेंचा अपघाती मृत्यूशिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे ५ वाजता मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात मेंदूला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मेटेंच्या अपघाती मृत्यूने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले Vinayak Mete death probe आहेत. तपासाकरिता टीमही तैनात केल्या आहे. मेटे यांच्या गाडीचा ड्रायव्हर एकनाथ कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात अनेक आंदोलने उभी केली. अखेरपर्यंत मराठा आरक्षणासाठी लढत राहिले. अखेरचा मृत्यूही मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी येत असताना झाल्याने मराठा समाजात शोक व्यक्त केला जातो आहे.

विनायक मेटेंचे आज अंत्यसंस्कारशिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे Vinayak Mete death in accident यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. बीडमध्ये त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. दुपारी ४ वाजता मेटे यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार होईल, अशी माहिती शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी Shivsangram Sanghata on Vinayak Mete दिली.

हेही वाचाMinor Girl Kidnapping अपहरण झालेल्या शाळकरी मुलीची अवघ्या बारा तासात केली सुटका

ABOUT THE AUTHOR

...view details