पालघर- वाघोबा खिंड येथे कागदाचे लगदे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे. ट्रक दहा फूट खोल दरीत पडून पलटी झाला आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ट्रक चालक व क्लिनर जखमी झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
वाघोबा खिंड येथे ट्रकचा अपघात; चालक व क्लिनर बचावले - Palghar Waghoba khind Truck Accident News
वाघोबा खिंड येथे कागदाचे लगदे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे. ट्रक दहा फूट खोल दरीत पडून पलटी झाला आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गुजरात राज्यातील वापी येथून कागदाचे मोठे लगदे घेऊन हा ट्रक पालघरला येत होता. मात्र, प्रवासादरम्यान या दहाचाकी ट्रकचा पालघर-मनोर महामार्गावरील वाघोबा खिंड येथे अपघात झाला. या अपघातात ट्रक रस्त्यावरून खाली घसरत दहा फूट खोल दरीत पलटी झाला. ट्रक चालक मोहम्मद अली यांचा आपल्या ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यामध्ये ट्रक चालक व क्लिनर हे जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हेही वाचा-श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा