महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 3 मजुरांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात

तलासरी तालुक्यातील वडवली गावाजवळ ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पालघर
पालघर

By

Published : Nov 11, 2020, 10:17 AM IST

पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काच वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यात 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. तलासरी तालुक्यातील वडवली गावाजवळ ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचे अचानक स्टेरिंग लॉक झाले. यादरम्यान मागून येणाऱ्या कंटेनरने ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. रात्री साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाचजण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तलासरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुचाकीस्वाराची मोटारीला धडक -

यापूर्वी वसई पश्चिममध्ये असलेल्या माणिकपूर पेट्रोल पंपाजवळ मोटार व दुचाकीचा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने मोटारीला धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार थोडक्यात बचावला होता. मात्र या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details