महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 27, 2020, 11:36 AM IST

ETV Bharat / state

लग्नाच्या बचतीतून दिव्यांगांना मदतीचा हात; दिव्यांगांना मदत म्हणून दिल्या ट्रायसायकल

लग्नात पैशाची उधळपट्टी न करता दिव्यांगांना मदत करुन अनोखा लग्न समारंभ पार पडला आहे. लग्नात विविध कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळून मनोर- तामसई येथील आदेश मधुकर पाटील याने दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात दिला आहे. त्याने आपल्या लग्नाच्या दिवशी दिव्यांगांना ट्राय सायकल भेट देत इतरांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

Tricycle help for the disabled in palghar
दिव्यांगांना ट्राय सायकल मदत

पालघर - लग्नात पैशाची उधळपट्टी न करता दिव्यांगांना मदत करुन अनोखा लग्न समारंभ पार पडला आहे. लग्नात विविध कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळून मनोर-तामसई येथील आदेश मधुकर पाटील याने दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात दिला आहे. त्याने आपल्या लग्नाच्या दिवशी दिव्यांगांना ट्राय सायकल भेट देत इतरांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

लग्न समारंभात लाखो रुपयांचा खर्च -
पालघर, ठाणे जिल्ह्यात विवाहावर लाखो रुपये खर्च केले जातात. विवाहाच्या आदल्या दिवशी हळद व मांडव प्रथाअसून या दिवशी जेवणावळीं बरोबरच मंडप, बँडबाजा यावर लाखो रुपयांचा खर्च केला जातो.

दिव्यांगांना ट्राय सायकल मदत
विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने केला साजरा -पालघर तालुक्यातील मनोर जवळील तामसई येथील रहिवासी आदेश मधुकर पाटील याचा आपल्या विवाह सोहळा पालघर येथील माध्यमिक पतपेढी सभागृहात अत्यंत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत व साधेपणाने पार पडला.सामाजिक दायित्व म्हणून दिव्यांगांना ट्राय सायकल मदत -पालघर- ठाणे जिल्ह्यातील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा आदेश पाटील हा कार्यकर्ता आहे. आपल्या विवाह सोहळ्यावर अनाठायी खर्च नकरता सामाजिक उत्तरदायित्व म्हणून लग्नानिमित्त दिव्यांगांना मदत करण्याचे ठरवले व कुटुंबाच्या संमतीने त्याने ते प्रत्यक्षात उतरवले आहे. आपल्या लग्नाच्या दिवशी पाच दिव्यांगांना ट्राय सायकलचे वाटप करून इतरांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आदेशच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा -संघराज्यांचा 'तो' विचार मारला तर रशियाप्रमाणे भारतातही राज्ये फुटतील - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details