पालघर - भावा-बहिणाच्या नात्यातील प्रेम, गोडवा सांगणारा सण म्हणजेच रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विक्रमगड भागातील आदिवासी महिलांनी बांबूपासून राख्या बनविल्या आहेत. या राख्या पर्यावरणपूरक असून यामधून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे.
पालघरमध्ये आदिवासी महिला तयार करतात पर्यावरणपूरक राख्या - रक्षाबंधनावर कोरोनाचा परिणाम
महिला कुठलीही मजुरी करायच्या. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील केशव सृष्टी या संस्थेमार्फत पुरक आणि स्वदेशीचा नारा देत महिलांना राख्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. उटावली, माडाचा पाडा, वाणीपाडा, वेढे, कुंज या गावातील महिलांना या राख्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानुसार आता महिला बांबूपासून राख्या बनवत आहेत.
महिला कुठलीही मजुरी करायच्या. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील केशव सृष्टी या संस्थेमार्फत पुरक आणि स्वदेशीचा नारा देत महिलांना राख्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. उटावली, माडाचा पाडा, वाणीपाडा, वेढे, कुंज या गावातील महिलांना या राख्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानुसार आता महिला बांबूपासून राख्या बनवत आहेत. त्यानंतर या राख्या विकण्यासाठी बाजारात पाठवत आहे. केशव सृष्टीच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. या महिलांनी आतापर्यंत ५० हजार राख्या बनविल्या आहेत. यामध्ये अनेक डिझाईन्स उपलब्ध असून मुंबई बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविल्या जात आहेत.