महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्षांनी केली दापरी दुग्ध प्रकल्पाची  पाहणी - Dapchari Dairy Development Project

हा प्रकल्प शासनाच्या अनास्थेमुळे बासनात गुंडाळण्यात आला होता. मात्र तरी देखील प्रकल्पांतर्गत दुग्धविकास कार्यालयातील कर्मचारी, कृषीधारक, वसाहती, धरण यांच्या अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी या प्रकल्पाची पाहणी करत आढावा बैठक घेतली.

प्रकल्पाची पाहाणी करताना आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित

By

Published : Sep 19, 2019, 8:14 AM IST

पालघर- डहाणू तालुक्यातील दापचरी दुग्धविकास प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वात मोठा दूध संकलन प्रकल्प आहे. १९६२ साली ६६९२ एकर (२६७७ हेक्टर) जमिनीवर या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प शासनाच्या अनास्थेमुळे बासनात गुंडाळण्यात आला होता. मात्र तरी देखील प्रकल्पांतर्गत दुग्धविकास कार्यालयातील कर्मचारी, कृषीधारक, वसाहती, धरण यांच्या अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी या प्रकल्पाची पाहणी करत आढावा बैठक घेतली.

आढावा बैठक घेताना आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित

मुंबई व उपनगरातील दुधाचा तुटवडा कमी करून लोकांना स्वच्छ व निर्भेळ दूध पुरवण्यासाठी, तसेच मुंबई व उपनगरातील खासगी तबेल्यांचे स्थलांतर करून मुंबईबाहेर नैसर्गिक स्वच्छ वातावरणात दूग्धोत्पादन करणे, हा या प्रकल्प निर्मिती मागचा उद्देष्य होता. त्याचबरोबर, बाधीत व लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देने देखील या मागचा महत्वाचा उद्देष्य होता. मात्र प्रकल्पाची पाहाणी केली असता शासनाचे सदरील उद्देष्य अयशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे व येथील प्रकल्प अधिकाऱ्यांनी मान्यही केले आहे.

यावेळी विवेक पंडित यांच्याकडून दूग्ध संकलन केंद्र, गोशाला, परशुराम धरण आणि रबरबोर्ड, वीज, पाणी, इत्यादी प्रकल्पातील विविध समस्या, खर्च करण्यात आलेला निधी याबाबत अधिकऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. त्याचबरोबर, पंडित यांनी कृषी क्षेत्रधारक, स्थानिक आदिवासी, प्रकल्पग्रस्त आदिवासी यांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यावेळी दुग्ध प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हणत मागे काय झाले यापेक्षा स्थानिक, आदिवासी कृषीक्षेत्रधारक यांच्या समन्वयाने अधिकाऱ्यांनी प्रस्ताव करून नव्याने काय करता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पंडित यांनी दिले.

त्यांनी भूमिपुत्रांना व्यवसाय मिळवून देता येईल का, तसेच दूग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रस्ताव करता येईल का, असे देखील अधिकाऱ्यांना आदेश देत परीपूर्ण लेखी माहिती घेतली. शिवाय स्थानिक तरुण दूग्ध व्यवसाय आणि शेती करण्यास उत्सुक असल्यास त्यांना प्रकल्पाची जमीन शासकीय भाड्डे पट्ट्यावर वापराकरिता देण्यात येईल. पुढील पाच वर्षात मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करून दापचरी प्रकल्पाचा काया पालट करून विकसित प्रकल्पाला नाव मिळवून देऊ, असे आश्वासन पंडित यांनी स्थानिकांना दिले.

हेही वाचा-शिवसेनेला मत न देण्याऱ्यांनाही आपलेसे करण्याचा प्रयत्न करणार - अदित्य ठाकरे

तसेच पंडित यांनी कृषी क्षेत्रधारक, वासाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तातडीने प्रश्न सोडवून अधिकाऱ्यांनी तातडीने नवीन प्रस्ताव तयार करावा असे आदेश दिले. यावेळी प्रकल्प अधिकारी, स्थानिक भूमिपुत्र , कृषिधारक, प्रकल्पग्रस्त आदिवासी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details