पालघर - दोन दिवसांपासून मोखाडा तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. जोरदार पावसामुळे त्र्यंबकेश्वर- मोखाडा रस्त्यावर तोरंगण नजीक झाड रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे.
मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर- मोखाडा रस्त्यावर झाड कोसळले, वाहतूक ठप्प - palghar
दोन दिवसांपासून मोखाडा तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे दरड कोसळण्याच्या आणि झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

झाड कोसळले
त्र्यंबकेश्वर- मोखाडा रस्त्यावर झाड कोसळले
रस्त्यावर पाणी आल्याने चालकांना जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागत आहेत. तसेच झाडे पडण्याच्या आणि रस्ता खचण्याच्या घटनाही घडत आहेत. मोरचुंडी येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात भूमीगत तारा टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून हा रस्ता खचल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.