पालघर (वाडा) - पालघर-देवगाव या रस्त्याचे रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, त्यामध्ये व्यापाऱ्यांचे दुकाने जात आहे. त्यामुळे व्यापारी वर्गातून या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला विरोध केला जात आहे. या रस्त्याचे रुंदीकरण कमी करावे, असी मागणी व्यापारी असोसिएशन करत आहे.
पालघर-देवगाव राज्यमार्गाच्या रुंदीकरणामध्ये दुकाने तुटणार; व्यापाऱ्यांचा विरोध - रुंदीकरण
रस्त्याला लागून दुकाने आहेत. तसेच पार्किंगची सोय देखील नाही. त्यामुळे अनेकदा नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे केवळ वाहतूक कोंडीच नाहीतर अपघात होतात. त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
पालघर-वाडा-देवगाव हा क्रमांक ३४ चा राज्य मार्ग वाडा शहरातून जातो. या रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. तसेच दोनचाकी, चारचाकी वाहनांना मोठ्या कसरतीने वाहतूक करावी लागते. याच रस्त्याला लागून दुकाने आहेत. तसेच पार्कींगची सोय देखील नाही. त्यामुळे अनेकदा नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे केवळ वाहतूक कोंडीच नाहीतर अपघात होतात. त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
जवळपास १५ मीटरपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. तसेच वाडा शहरातून १२०० मीटरचे काँक्रीटीकरण होत आहे. मात्र, या रस्त्यावर ४०० मीटरपर्यंत अतिक्रमण असल्याची माहिती सार्वजनीक बांधकाम उपविभागाकडून देण्यात आली. तसेच १५ मीटरच्या रुंदीकरणामध्ये व्यापाऱ्यांचे दुकाने तुटणार आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. आमचा विकासाला विरोध नाही. मात्र, हे रुंदीकरण १५ मीटर न करता १२ मीटर करण्याची मागणी व्यापारी असोसिएशनचे सल्लागार संतोष पातकर यांनी केली आहे. यापूर्वी देखील व्यापारी वर्गाकडून तत्कालीन पालकमंत्री विष्णू सवरा आणि नवनियुक्त पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे रूंदीकरणाबाबत निवेदने दिलेली होती.