महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑगस्टपर्यंत पालघर जिल्ह्यात पावसाळी पर्यटनास मनाई: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - palghar tourism department decision

पालघर जिल्ह्यात असलेले धबधबे, तलाव, धरणे, किल्ले व समुद्रकिनारी या ठिकाणी पावसाळ्यात मोठया प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी आल्याने गर्दी होण्याची व सोशल डिस्टन्सिंग अंतर राखले न जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत.

palghar tourism
ऑगस्टपर्यंत पालघर जिल्ह्यात पावसाळी पर्यटनास मनाई: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By

Published : Jul 5, 2020, 11:11 AM IST

पालघर -जिल्ह्यातील धबधबे, तलाव, धरणे, किल्ले व समुद्रकिनारी पावसाळ्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येतात. यावेळी जीवितहानी होण्याच्या घटना देखील घडत असतात. कोरोना विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेता, पर्यटकांना पर्यटनस्थळांवर जाण्यास १ ऑगस्टपर्यंत मनाई करण्यात आली आहे. मनाई आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

पालघर जिल्ह्यात असलेले धबधबे, तलाव, धरणे, किल्ले व समुद्रकिनारी या ठिकाणी पावसाळ्यात मोठया प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी आल्याने गर्दी होण्याची व सोशल डिस्टन्सिंग सामासिक राखले न जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून 12 जूनलाच आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशान्वये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३४ (सी) अन्वये 1 ऑगस्टपर्यंत पालघर जिल्ह्यामधील सर्व धबधबे, तलाव, धरणे, किल्ले व समुद्र किनारी जाण्यास मनाई आदेश लागू केले आहेत. या मनाई आदेशाचे सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details