महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खवळलेल्या समुद्रात अतिउत्साही पर्यटकांची स्टंटबाजी - tourist stunt

शिरगाव समुद्र किनारी मात्र काही अतिउत्साही पर्यटक या सगळ्यांकडे कानाडोळा करून खवळलेल्या समुद्र उतरून स्टंटबाजी करण्याचा करताना दिसून आले.

खवळलेल्या समुद्रात अतिउत्साही पर्यटकांची स्टंटबाजी

By

Published : Aug 3, 2019, 7:54 PM IST

पालघर- शिरगाव येथे खवळलेल्या समुद्रात अतिउत्साही पर्यटक स्टंटबाजी करत आहेत. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर 5.88 मीटर उंच लाटा उसळत असून समुद्र खवळलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडून किनारपट्टीच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खवळलेल्या समुद्रात अतिउत्साही पर्यटकांची स्टंटबाजी


पालघर तालुक्यातील शिरगाव समुद्र किनारी मात्र काही अतिउत्साही पर्यटक या सगळ्यांकडे कानाडोळा करून खवळलेल्या समुद्र उतरून स्टंटबाजी करण्याचा करताना दिसून आले. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी पर्यटकांच्या याच अतिउत्साहामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तरी हे अतिउत्साही तरूण पर्यटक आपल्या जिवाची पर्वा न करता धोकादायक परिस्थितीत अशाप्रकारे आपला जीव धोक्यात घालून स्वतःच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details