पालघर- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप व सेना वेगळे लढले होते. मात्र, २०१९ च्या या लोकसभा निवडणुकीत वाघ आणि सिंह एकत्र आले आहेत. ते एकत्र आल्यानंतर जंगलातील कितीही लांडगे आणि कोल्हे एकत्र आले तरी देखील ते लढाई जिंकू शकत नाही. त्यामुळे यंदाची लढाई वाघ आणि सिंहच जिंकणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज पालघरमध्ये बोलत होते.
लोकसभेच्या निवडणुकीत वाघ आणि सिंह एकत्र आल्याने विजय आमचाच - देवेंद्र फडणवीस - राजेंद्र गावित
लोकसभा निवडणुकीत वाघ आणि सिंह एकत्र आले आहेत. ते एकत्र आल्यानंतर जंगलातील कितीही लांडगे आणि कोल्हे एकत्र आले तरी देखील ते लढाई जिंकू शकत नाही. त्यामुळे यंदाची लढाई वाघ आणि सिंहच जिंकणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणसीस यांचा विश्वास.
पालघर लोकसभा महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. वाघ आणि सिंह एकत्र आल्यामुळे आता "शिट्टी पिट्टी गुल झाली आहे" असे म्हणत, बहुजन विकास आघाडीला न मिळालेल्या "शिट्टी" या चिन्हावरुन बहुजन विकास आघाडीची खिल्ली फडणवीस यांनी उडवली.
पालघर लोकसभेसाठी महायुतीकडून राजेंद्र गावित हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचा मुकाबला बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांच्याशी होत आहे.