पालघर (वाडा) - घरावर वीज पडून एकाच कुटुंबातील तीनजण जखमी झाली आहेत. ही घटना डहाणू तालुक्यातील धरमपूर येथे रविवारी रात्री घडली. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डहाणू तालुक्यात घरावर वीज पडून एकाच कुटुंबातील तीन जखमी - श्रेया श्रीनाथ झिरवा
घरावर वीज पडून एकाच कुटुंबातील तीनजण जखमी झाली आहेत. रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरू होता. दरम्यान, घरावर जोरदार वीज पडली आणि झोपेत असलेले तिघे जखमी झाले.
रुग्णालय भरती असलेले जखमी
मायश्री रामा झिरवा (वय २०), श्रीनाथ रामा झिरवा (वय २२), श्रेया श्रीनाथ झिरवा (वय २१) अशी जखमींची नावे आहेत. रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरू होता. दरम्यान, घरावर जोरदार वीज पडली आणि झोपेत असलेले तिघे जखमी झाले. जखमी झालेल्यांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींपैकी एक महिला गर्भवती आहे. तर दुसऱ्या मुलीच्या कानाला धक्का लागल्याने तिला ऐकायला येत नाही, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
Last Updated : Jul 22, 2019, 4:39 PM IST