पालघर -जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशन परिसरात कार, ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत ( Fatal accident involving car and truck ) तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पालघर जिल्ह्यात रविवारी झालेल्या भीषण अपघातात नवजात बालकासह तिघांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका ट्रकने मागून कारला धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पोलिसांनी जखमींचे जबाब नोंदवलेले नाहीत.
Accident News : पालघरजवळ कार-ट्रकचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू तर चार गंभीर - Three died on the spot
पालघर - जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशन परिसरात कार, ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत ( Fatal accident involving car and truck ) तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

कारमध्ये एकाच कुटुंबातील 7 जण -एकाच कुटुंबातील सात जण मुंबईहून गुजरातमधील भिलाडला कारने जात असताना कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिराजवळ सकाळी 11.45 वाजता हा अपघात झाला. पालघर पोलिसांचे प्रवक्ते सचिन नावडकर यांनी सांगितले की, नरोत्तम राठोड (६५), त्यांचा मुलगा केतन राठोड (३२) एक वर्षाची मुलगी आरवी राठोड अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये दिपेश राठोड (35), तेजल राठोड (32), मधु राठोड (58) स्नेहल राठोड या अडीच वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
अद्याप गुन्हा दाखल नाही -अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, अपघातासंदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी जखमींची प्रकृती पाहता त्यांचे जबाब नोंदवलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.