पालघर- बहुजन विकास आघाडी पक्षाच्या तीन आमदारांनी सत्तास्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाला पाठींबा दिला आहे. नालासोपाराऱ्याचे बविआचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आपल्या तिन्ही आमदारांचा पाठिंबा भाजपला दर्शवला आहे.
बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचा भाजपला पाठिंबा - आमदार क्षितीज ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
बहुजन विकास आघाडी पक्षाच्या तीन आमदारांनी सत्तास्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाला पाठींबा दिला आहे.
बविआच्या तीन आमदारांसोबत अन्य पक्षाच्या व अपक्ष अशा १० आमदारांनीही आपला पाठिंबा भाजपला दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थीतीत बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा विधानसभेचे आमदार क्षितिज ठाकुर, शेतकरी कामगार संघटनेचे श्यामसुंदर शिंदे (लोहा), जनसूर्य शक्तिचे विनय कोरे (शाहूवाडी), अपक्ष उमेदवार रवी राणा (बडनेरा), संजय शिंदे (करमाळा), गीता जैन (मीरा-भायंदर), महेश बालदी (उरण), किशोर जोरगेवार (चंद्रपुर), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र राऊत (बार्शी), प्रकाश आवाडे (इचलकरंजी) आदी आमदारांनी भाजपला पाठींबा दिला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याशी या आमदारांनी विविध विषयांवर चर्चा केली.