महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये 322 नवे कोरोना रुग्ण; 603 जण कोरोनामुक्त - 322 new patient in vasai

322 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 344 वर गेली आहे. 4 हजार 931 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

vasai virar corona update
वसई विरार कोरोना अपडेट

By

Published : Jul 11, 2020, 1:20 PM IST

वसई-विरार (पालघर) - वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोना प्रसार वाढला आहे. शुक्रवारी वसई-विरारमध्ये एका दिवसात 322 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

शुक्रवारी दिवसभरात उपचारादरम्यान 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 603 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 322 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 344 वर गेली आहे.

वसई-विरारमध्ये आतापर्यंत एकूण 150 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत 4 हजार 931 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 हजार 263 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details