वसई-विरार (पालघर) - वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोना प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येते. दिवसाला सरासरी 150 ते 200 नवे कोरोनाबाधित सापडत आहेत. मात्र, रविवारी वसई -विरारमध्ये एका दिवसात 360 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
रविवारी दिवसभरात उपचारादरम्यान 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 202 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.