पालघर -जिल्ह्यातील वाडा तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे. आजच्या तीन वाजताच्या अहवालात वाडा तालुक्यातील तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ३३ वर्षीय पुरुष वाडा येथील रहिवासी असून उत्तर प्रदेश येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आला. २२ वर्षीय स्त्री वाडा येथील रहिवासी असून रत्नागिरी येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आली. १२ वर्षीय स्त्रीचा पनवेल येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे पालघर ग्रामीण जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 38 झाले आहेत.
पालघरमधील वाडा तालुक्यात 3 कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील ग्रामीण भागात 38 कोरोनाबाधित - पालघर कोरोना अपडेट्स
३३ वर्षीय पुरुष वाडा येथील रहिवासी असून उत्तर प्रदेश येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आला. २२ वर्षीय स्त्री वाडा येथील रहिवासी असून रत्नागिरी येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आली.
सदर या तीन रुग्णाच्या संपर्कातील 24 जणांना वाडा जवळच एका ठिकाणी क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती वाडा वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बुरपल्ले यांनी बोलताना सांगितले. तसेच या तीन रुग्णांना टीमा येथे हलविणयात येत असल्याची माहिती जिल्हा सिव्हिल सर्जन कांचन वानरे यांनी बोलताना सांगितले. दरम्यानच्या काळात वाडा बाजारपेठेतील दुकाने खुली होती. सोशल अंतरचे तीनतेरा वाजले होते. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. मात्र, दरम्यानच्या काळात गडचींचले प्रकरणातील एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तेथील पोलीस कर्मचारी आणि आरोपींची चाचणी घेतली होती. त्यात बहुतांशी लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.