पालघर :‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाध्ये रोजगार मेळावा देखील घेण्यात आला आहे. 2 ते 3 हजार तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. यापुर्वी देखील असे कार्यक्रम काही जिल्ह्यात झाले आहे. राज्यांमध्ये 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना या अभियानाच्या माध्यमातून पोहचविल्या आहेत. सामान्य माणसापर्यंत जोपर्यंत योजना पोहचणार नाही तोपर्यंत सरकार काम करीत राहिल सर्वसामान्यांसाठी हे सरकार वर्षाभरापुर्वी स्थापन झाले या सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोणालाही वैयक्तीक लाभ होईल असा निर्णय या शासनाने घेतला नाही शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्र बिंदू मानून हे शासन काम करत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 2 लाख 12 हजार 683 लाभार्थ्यांना 212 कोटी रुपयांचा लाभ ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाअंतर्गत देण्यात आला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
जनतेचे जिवनमानात बदल : पालघर जिल्ह्यासाठी रुग्णालयाचे भूमिपूजन, जलजिवन मिशनचे ई-भूमिपूजन करण्यात आले. सर्व सामान्याच्या जिवनामध्ये बदल घडविणे त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आले आहेत. सर्व सामान्याच्या जिवनामध्ये सकारात्मक अमुलाग्र बदल घडविणे हाच उद्देश शासनाचा आहे. सर्व सामान्य नागरीकांसाठी या शासनाने जवळपास चारशे निर्णय घेतले आहेत. अनेक लोकाभिमूख प्रकल्प होताहेत उद्योग वाढीसाठी अनेक निर्णय घेतले आहे. त्यासाठी रेड कार्पेट देण्यात आला आहे. आदिवासी समाजाचे राहणीमान उंचावले पाहिजे. इतर सर्व सामान्य जनतेचे जिवनमानात देखील बदल घडविण्याचा उद्देश शासनाचा आहे. बांद्रा-वर्सोवा हा प्रकल्प पुढे नेण्यात येणार आहे. विरार ते पालघर हा प्रकल्प देखील चालू करण्यात येणार आहे पुर्वी जे प्रकल्प राबविण्यात आले नव्हते ते सर्व प्रकल्प या शासनाने चालू केले आहेत.
गुंतवणकीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर :मुंबईसह महाराष्ट्राचे सर्व पायाभूत सुविधाचे प्रकल्प सुरु आहेत. मागील 11 महिन्यामध्ये परदेशी थेट गुंतवणकीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. प्रथमच मागच्या मंत्रीमंडळ बैठकी मध्ये सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानासाठी 1500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये मच्छीमार बांधवासाठी तरतूद करण्यात आली. पंचामृत अर्थसंकल्पामध्ये सर्व समावेशक विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे.
1 हजार 850 तरुणांना रोजगार :जिल्ह्यातील पोलीस विभागाने देखील रोजगार मेळावा घेतला दहा हजार तरुणांनी सहभाग नोंदविला होता. या रोजगार मेळाव्यात 1 हजार 850 तरुणांना रोजगार मिळाला आहे. पोलीस दलाने कायदा सुव्यवस्था राखण्या बरोबरच सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम केले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. लेक लाडकी लखपती या योजनेअंतर्गत मुलगी जन्माला आल्या बरोबर एक लाख रुपयाचे अनुदान जाहिर करण्यात आले. शेतकरी वर्गासाठी केंद्र सरकार 6 हजार अनुदान देते तर राज्य शासन 6 हजार असे एकुण 12 हजार रुपयांचे अनुदान शेतकरी बाधवांना देण्यात येत आहे. मागील शासनाच्या काळात 2014 ते 2019 या कालावधीमधील लोकाभिमुख प्रकल्प बंद करण्यात आले होते. त्या सर्व योजना पुन्हा सुरु करण्यात आल्या त्याचा फायदा जनतेला होत आहे. केंद्र शासनाचा भक्कम पाठींबा राज्य शासनाला असल्यामुळे आपण सर्व महत्वकांशी प्रकल्प पुढे नेत आहोत असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर :जागतिक स्तरावरील सर्वेनुसार लोकप्रिय नेत्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना 84 टक्के लोकांनी पसंती देऊन त्यांना प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. या देशाचा सन्मान जागतिक स्तरावर राखण्याचे कार्य प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी केले आहे. या देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर आहे. यांचे सर्व श्रेय प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांना जाते. पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी यांनी सुचविलेले प्रकल्प पुर्ण करण्यात येणार आहे. एमएमआरडीएची व्याप्ती देखील सपूर्ण जिल्ह्यात करण्यात येणार आहे. पालघर जिल्हा मुख्यालय हे देशात सर्वात प्रशस्त इमारत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लांभार्थ्यांना विविध वस्तंचे वाटप करण्यात आले.