महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई विरारमध्ये 13 पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 237 वर - कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 237 वर

वसई विरार शहरात १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने बाधितांची संख्या २३७ वर पोहोचली आहे. मंगळवारी २ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर दोघांचा मृत्यू झाला.

corona patient increased in vasai virar
वसई विरारमध्ये 13 कोरोना रुग्ण वाढले

By

Published : May 13, 2020, 10:28 AM IST

वसईव-विरार(पालघर)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरामध्ये वाढत असून मगंळवारी १३ कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या २३७ वर पोहोचली आहे. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात २ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

वसई-विरार मधील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या मंगळवारी १२७ वर पोहोचली आहे. २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरातील मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. ४८ वर्षीय महिला तर ५८ वर्षीय पुरुष या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वसई विरारमधील कोरोनाबाधितांची संख्या २३७ वर पोहोचली आहे. कोरोनाबाधितामंध्ये अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींचा समावेश आहे. शहरातील कोरोनामुक्त एकूण रुग्णांची संख्या १२७ आहे तर ९९ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details