पालघर -घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. मागील काही दिवसांपूर्वी नालासोपारा पूर्वेतील आचोळे रोडवर असलेल्या एका मोबाईलचे दुकान फोडून, या चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केली आहे.
घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक
घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. मागील काही दिवसांपूर्वी नालासोपारा पूर्वेतील आचोळे रोडवर असलेल्या एका मोबाईलचे दुकान फोडून, या चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केली आहे.
नालासोपारा पूर्वेतील आचोळे रोडवर श्रीनाथ नावाच्या मोबाईलचे दुकान चोरट्यांनी ६ ऑक्टोबर रोजी फोडले होते. या दुकानामधून चोरट्यांनी ३२ मोबाईल व रोख रक्कम असा ४ लाख ४५ हजार किंमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल झाल्यापासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना नालासोपारा येथून, तर एका आरोपीला डोंबिवलीमधून ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून 3 लाख 12 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.