पालघर -बोईसर परिसरात रात्रीच्या वेळी चोरांचा सुळसुळाट पसरल्याचे समोर आले आहे. विद्यानगर परिसरातील सह्याद्री आणि सिद्धी विनायक सोसायटी परिसरात चोरी करण्याच्या हेतूने 'हाफपँट' घातलेले व चेहरे झाकलेले पाचजण फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
बोईसर परिसरातील काही संशयित व्यक्ती चोरी करण्याच्या हेतूने फिरत असल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजमधून समोर आले आहे. बोईसर येथील विद्यानगर परिसरातील चिन्मया हायस्कुलनजीक असलेल्या सह्याद्री आणि सिद्धी विनायक सोसायटीच्या आवारात हे पाचजण चोरी करण्याच्या हेतूने फिरत होते. शनिवारी रात्री १ च्या सुमारास 'हाफपँट' घातलेल्या व चेहरे झाकलेल्या चोरांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत.