महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर : मोबाईल दुकानात चोराची हातचलाखी सीसीटीव्हीत कैद - Nalasopara Mobile theft

मोबाईलच्या दुकानात चोराची हातचलाखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज रोड येथील पार्थ टेलिकॉम या मोबाईल दुकानामध्ये  हा प्रकार घडला.

सीसीटिव्ही चित्रीकरण

By

Published : Nov 16, 2019, 9:52 AM IST

Updated : Nov 16, 2019, 10:06 AM IST

पालघर -नालासोपाऱ्यातील मोबाईलच्या दुकानात चोराची हातचलाखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज रोड येथील पार्थ टेलिकॉम या मोबाईल दुकानामध्ये हा प्रकार घडला. शुक्रवारी मोबाईल घेण्याच्या बहाण्याने हा चोर दुकानात आला होता.

चोराची हातचलाखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद


मोबाईल हाताळताना त्याने काउंटर समोर ग्राहकांसाठी ठेवलेल्या डेमो पीस मधून एक मोबाईल उचलून खिशात टाकला. डेमोचा मोबाईल काढताना दुकानातील सायरनची बॅटरी कमी असल्याने सायरन वाजला नाही. याचाच फायदा घेत चोरटयाने मोबाईल चोरून नेला.

हेही वाचा - रेल्वेच्या तिकीट खिडकीसाठी ठिय्या आंदोलन


चोरी झालेल्या मोबाईलची किंमत 15 हजार रुपये होती. चोरीच्या संदर्भात मोबाईल दुकानाच्या मॅनेजरने तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीसीटीव्हीच्या आधारे तुळिंज पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

Last Updated : Nov 16, 2019, 10:06 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details