पालघर - वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने जबरी चोरी व घरफोडी गुन्हे करणाऱ्या आरोपींना अटक केली असून याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पालघरमध्ये जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या चार आरोपींना अटक, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत - palghar police in action
वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली असून आरोपींकडून १ लाख ८७ हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
घरफोडी व जबरी चोरी करणाऱ्या आरोपी विशाल प्रमोद गुप्ता (वय, १९), जयप्रकाश मिश्रा ऊर्फ योगेश (वय, २५), विनोद प्रकाश बाबर (वय, २४), अतिश दत्ताराम साखरकर (वय, ३०) यांना गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान, त्यांची चौकशी केली असता त्यांनी वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी व घरफोडी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून १ लाख ८७ हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत केला असून वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत.
हि कारवाई वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धायरकर, मनोज मोरे,सचिन दोरकर यांच्यासह पथकाने केली.